Categories
News

१९ वर्षाची नाळ तुटली

१९ वर्षाची नाळ तुटली…२००२ मध्ये माझा मोठा मुलगा हिमांशू याला सेंट झेवियर्स स्कूल मध्ये admission घेतले, नंतर माझा छोटा मुलगा आर्यन याला सुद्धा २००९ मध्ये याच स्कूल मध्ये admission मिळाले..हिमांशू २०१४ मध्ये 10th मध्ये पास होऊन बाहेर पडला आणि आज छोटा आर्यन याचा 10th मधील send off झाला..मला दोन्ही मुलांना स्कूल मध्ये सोडायला आणि आणायला जायची खुप आवड..सेंट झेवियर्स चा कॅम्पस तर खुप छान तिथे जाऊन मुलांची वाट बघत बसणे आवडायचे..मुलांना स्कूल मध्ये सोडुन तसच कंपनी मध्ये जाणे हा माझा दिनक्रम गेली १९ वर्षे सुरू होता…. अखेर आज तो दिनक्रम संपला….कारण उद्यापासून मला सोडायला जावे लागणार नाही.सेंट झेवियर्स ने माझ्या दोन्ही मुलांना खुप छान घडवले….तेथील सर्व स्टाफ खुपच छान…गेली १९ वर्षे माझा या स्कूल शी खुप संपर्क राहिला …स्कूल मध्ये प्रत्येक इव्हेंट छान साजरे व्हायचे..त्यामुळे जरी आर्यन चा send off झाला ,तरी माझाच सेंड ऑफ झालेचे फिलिंग आहे…असे स्कूल लाईफ परत येणे नाही.. Good bye And Thanks St. Xavier’s staff
…Sudhir & Manisha Jawalkar..